६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रातून ‘अग्निपंख’ प्रथम


मुंबई : ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून समर्थ रंगभूमी संस्थेच्या “अग्निपंख” या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच वीरशैव समाज (लांजा) संस्थेच्या “ईठ्ठला” या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे रत्नागिरी केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे : खरडेवाडी क्रीडा मंडळ, मेर्वी या संस्थेच्या इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स) या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक ओंकार पाटील (नाटक-अग्निपंख), द्वितीय पारितोषिक अमोल रेडीज (नाटक-ईठ्ठला), तृतीय पारितोषिक संदेश तोडणकर (नाटक-इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स) प्रकाश योजना प्रथम पारितोषिक साई शिर्सेकर (नाटक-अग्निपंख), द्वितीय पारितोषिक दयानंद चव्हाण (नाटक-ईठ्ठला), तृतीय पारितोषिक अभिजीत डोंगरे (नाटक-इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स) नेपथ्य: प्रथम पारितोषिक प्रवीण धुमक (नाटक-अग्निपंख) द्वितीय पारितोषिक संदिप सावंत (नाटक-ईठ्ठला), तृतीय पारितोषिक सत्याजीत गुरव (नाटक-येऊन येऊन येणार कोण?) रंगभूषा प्रथम पारितोषिक उदयराज तांगडी (नाटक-अग्निपंख), द्वितीय पारितोषिक गजानन पांचाळ (नाटक-इंठ्ठला) तृतीय पारितोषिक नरेश पांचाळ (नाटक-इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स) संगीत दिग्दर्शन प्रथम पारितोषिक ओंकार बंडबे (नाटक- अग्निपंख), द्वितीय पारितोषिक प्रदीप कांबळे (नाटक- इंठ्ठला), तृतीय पारितोषिक योगेश मांडवकर (नाटक-इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स)) वेशभूषाः प्रथम पारितोषिक चैताली पाटील (नाटक- अग्निपंख), द्वितीय पारितोषिक संतोष डोर्लेकर (नाटक-ईठ्ठला) तृतीय पारितोषिक विश्वनाथ नवाले (नाटक- इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक मिनार पाटील (नाटक-अग्निपंख) व ऋचा भुते (नाटक-अग्निपंख), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अमोल रेडीज (नाटक-ईठ्ठला), जयू पाखरे (नाटक-ऑक्सिजन), संदेश तोडणकर (नाटक-इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स), गोपाळकृष्ण जोशी (नाटक-येऊन येऊन येणार कोण ?), अर्चना पेणकर-पांचाळ (नाटक-ईठ्ठला), तन्वी शिंदे (नाटक- इम्युनिटी (द व्हाइस ऑफ टॉलरन्स), डॉ. नेहा उकिडवे (नाटक मंगलाक्षता), निवेदिता मणचेकर (नाटक-ऑक्सिजन)

दि. १० नोव्हेंबर ते ०९ डिसेंबर या कालावधीत शहरातील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास पांगारकर, सुनील जगताप आणि श्रीमती संगिता टेकाडे यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले.

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व संस्था आणि कलाकार यांनी मेहनत घेऊन सादर केलेल्या सर्व दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. भविष्यातही संस्था व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button