
सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे दिव्यांग सप्ताहाचा मंगळवारी समारोप
रत्नागिरी, दि. 8 ): शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागातंर्गत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत दिव्यांग सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा सांगता कार्यक्रम 9 डिसेंबर रोजी मराठा मंदिर सभागृह येथे सकाळी 10 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. ‘सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे’ अशी या कार्यक्रमाची संकल्पना आहे. जास्तीत जास्त दिव्यांगानी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनिता शिरभाते यांनी केले आहे.
या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 चा कायदा, दिव्यांगत्व जन्माला येवू नये याबाबत डॉ. स्वाती पाटील (आर.बी.एस.के.), चॅट बॉट विषयावर अभिजित भट (आय.टी.सेल. जि.प. रत्नागिरी), शासकीय योजनांबाबत दीपक आंबवले (प्र. वैसाका), वित्तीय महामंडळाच्या जिल्हा समन्वयक रोशनी सावंत, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र योजनांबाबत संकेत चाळके (स्पीच थेरपिस्ट) मार्गदर्शन करणार आहेत. याचबरोबर विशेष प्राविण्यप्राप्त दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. कार्यक्रमात कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यामंदिर, सविता कामत विद्यामंदिर, शामराव भिडे कार्यशाळा या शाळेचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.




