
संगमेश्वर तालुक्यातील हरेकरवाडी -तुरळ येथे झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील हरेकरवाडी (तुरळ) येथे कवळ तोडताना झाडावरून पडून ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांचे नाव तानू झिंगू बामणे असे आहे. ही घटना ८ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. पोलीस पाटील संजय ओकटे यांनी दिलेल्या माहितीनुसार तानू बामणे हे सायंकाळी सुमारे ५ वा. शेतीसाठी शेवरीच्या झाडावर चढून कवळ तोडत होते. या दरम्यान पाय घसरून ते झाडावरून खाली पडले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्रथम कडवई आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात दाखल केले. वालावलकर रूग्णालयात आयसीयु विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती आणखी बिघडली. व रात्रौ ९.४५ वा. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो. उ. नि. व्ही. व्ही. साळवी करीत आहेत.www.konkantoday.com




