वाशिष्ठीत दिशा नसल्याने गाळ उपसा मोहीम काहीशी विस्कळीत…


जुलै २०२१ मधील प्रलयंकारी महापुरानंतर सुरू झालेले वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा मोहीम यावर्षी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत चार ठिकाणी गाळ उपशासाठी यंत्रसामुग्री लावण्यात आल्या असल्या तरी स्पष्ट दिशा नसल्याने गाळ उपसा मोहीम काहीशी विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. पाटबंधार विभागाच्या नियोजनानंतर चिपळूण बचाव समिती सदस्यही ताशेरे ओढत आहे. त्यामुळे आता अधिवेशनानंतर आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे.
२०२१ मधील अतिवृष्टी आणि महापुरात चिपळूण शहर परिसराची मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाली. त्यामुळे या महापुराला कारणीभूत असलेल्या नद्यांतील गाळाचा प्रश्‍न पुढे आला. पुढे शहरवासियांनी त्यासाठी जनआंदोलन उभारले. यातूनच गाळ उपशासाठी कोट्यवधींचा निधी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला. मंत्रालयस्तरावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी वाशिष्ठी नदंतील प्रवाहाला ठरणारे अडथळे, बेटे, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button