लांजा–साटवली एसटी टेम्पो धडकेत चार जण जखमी


लांजा–साटवली मार्गावरील गोळवशी डंगाच्या कोपऱ्यावर गुरुवारी दुपारी कॅरी टेम्पोने एसटी बसला दिलेल्या धडकेत टेम्पोतील चौघेजण जखमी झाले. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पो चालकावर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस चालक प्रशांत पांडुरंग यादव (वय ४५, रा. कुरूपवाडी, ता. लांजा) यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. ते रुण–लांजा या मार्गावर एसटी बस (क्र. एमएच-१४-बीटी-१४८३) घेऊन येत असताना दुपारी सुमारे १.३० च्या सुमारास गोळवशी डंगाच्या कोपऱ्यावर चढणीदरम्यान लांजाहून देवी–हसोळकडे जाणारा कॅरी टेम्पो (क्र. एमएच-०७-एजे-०१७२) अचानक पुढील बाजूला येऊन बसला धडकला.

हा टेम्पो फिरोज इकबाल शेख (वय ३८, रा. आरवली, ता. वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग) चालवत होता. धडकेत टेम्पो चालक फिरोज शेख, सलमा फिरोज शेख (वय ३५), योगेश रमाकांत राऊळ (वय ३३, रा. आम्रट, ता. कुडाळ) आणि योगिनी योगेश राऊळ (वय २५) असे चार जण जखमी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button