रेल्वे स्थानकात रेल्वेतून चुकून खाली उतरलेला वृद्ध आरसीएफ पथकाच्या मदतीने नातेवाईकांच्या ताब्यात


कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या तिरूनवेली-जामनगर एक्सप्रेसमधील ७५ वर्षीय वृद्ध चुकून गाडीतून खाली उतरला. ही बाब कोकण रेल्वेच्या आरपीएफ पथकांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने तेथे पोहोचले. वृद्धास सुखरूप ताब्यात घेत कुटुंबियांशी संपर्क साधत सुपूर्द केले. हा प्रकार ४ डिसेंबर रोजी चिपळूण रेल्वे स्थानकात घडला.
१९५७७ क्रमांकाच्या तिरूनवेली-जामनगर एक्सप्रेसमधून ७५ वर्षीय वृद्ध प्रवास करत होते. चिपळूण येथील स्थानकात ते खाली उतरले. वडील गाडीमध्ये नसल्याची बाब मुलाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने रेल्वे मदत केंद्राकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर कोकण रेल्वेच्या आरपीएफ पथकाने जलद गतीने शोध सुरू केला.
आरपीएफच्या गस्ती पथकाला एक वृद्ध व्यक्ती चिपळूण प्लॅटफॉर्मवर दिशाहीनपणे चालताना दृष्टीस पडला. त्यांच्यामध्ये गोंधळ दिसून येत होता. पथकातील कर्मचार्‍यांनी काळजीपूर्वक त्यांच्याशी संभाषण केले. यादरम्यान अनावधानाने ट्रेनमधून उतरल्याचे सांगितले. त्यानुसार रेल्वे मदत तक्रारीसह तपशिलाची उलट पडताळणी करत पथकाने त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधत त्यांच्या ताब्यात दिले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button