
रेणुका प्रतिष्ठान, रत्नागिरीतर्फे संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभंग गायन आणि चरित्र कथन
रत्नागिरी, (वार्ताहर):
रेणुका प्रतिष्ठान, रत्नागिरी चा वर्धापन दिन आणि संत नामदेव महाराजांचे ६७५ वे निर्वाण वर्ष या दुहेरी निमित्ताने राष्ट्रसेविका समिती, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेवांचे अभंग गायन व चरित्र कथन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६:३० या वेळेत पित्रे वसातीगृह, सन्मित्र नगर, रत्नागिरी येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे वक्ते म्हणून संत नामदेव साहित्य अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पतंगे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सौ. दीपाताई पाटकर (अध्यक्ष) आणि ॲड. सौ. मानसी डिंगणकर (सचिव) यांनी संयोजन केले आहे. संयोजकांनी रत्नागिरीतील सर्व बंधू-भगिनींना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.




