
राधिका भिडेच्या गायनाने फाटकच्या स्नेहसंमेलनाला चार-चाॅंद.
आयपॉप स्टार गायिका राधिका विशेष अतिथी म्हणून निमंत्रित.
नुकत्याच संपन्न झालेल्या फाटक हायस्कूल व गांगण – केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष अतिथी म्हणून आय पाॅपस्टार गायिका, संगीत निर्माता, फाटक हायस्कूलची माजी विद्यार्थिनी
राधिका भिडेला निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी राधिका भिडेचा दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीच्या कार्याध्यक्षा अॅड.सुमिता भावे यांच्या हस्ते भेटवस्तू आणि शताब्दी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रंगमंचावर मुख्याध्यापक राजन कीर उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी संस्था पदाधिकारी तसेच सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण असलेल्या, संगीत निर्माता, राधिकाने सादर केलेल्या ‘ मन धावतया आणि उजेड पडला छान गनोबा ‘ या लोकप्रिय गीताने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन केलेल्या सुंदर सादरीकरणाने वातावरण उत्साही झाले. लोकनृत्य स्पर्धेत नववी – दहावीच्या गटात नववी ई चे गोंधळ नृत्य, दहावी अ चे वारकरी नृत्य आणि नववी अ चे शेतकरी नृत्य यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. विजेत्यांना स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. कर्जबाची सूत्रसंचालन दिनेश नाथनकर, शिल्परेखा जोशी यांच्यासह विद्यार्थ्यांनी केले.




