राजापूर पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर


राजापूर राजापूर पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी आदर्श संस्था पुरस्कारासाठी येळवण येथील ग्रामीण समाज प्रबोधिनीची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा पत्रकार दिनी ६ जानेवारी रोजी होणार आहे.
यावर्षी आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार गेली अनेक दशके राजापूर शहरात वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉ.पी.एस. बावकर यांना, कृषी विषयक पुरस्कारासाठी पंचगव्य आणि गोधन संरक्षण कामासाठी सोलगांव येथील सई सुहास पंडित यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जि.प.विश्वनाथ विद्यालय क्र. १ च्या मुख्याध्यापिका अक्षता रहाटे यांची निवड करण्यात आली आहे. तालुक्यात शिक्षण, आरोग्य शेती आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो या पार्श्वभूमीवर पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागामध्ये राजापूर व संगमेश्वर तालुक्यात मुलांना माध्यमिक शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे चंदुभाई देशपांडे यांची ग्रामीण समाज प्रबोधिनीची आदर्श संस्था पुरस्कारासाठी निवड झाली. आहे. तर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना अक्षता रहाटे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. शिक्षणासोबतच विविध उपक्रम राबवून ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button