रत्नागिरी शहर परिसरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १३ कोटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने रत्नागिरी शहर परिसरातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील जेलरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या बहुप्रतीक्षित बांधकामासाठी शासनाने १३.५३ कोटी रुपये इतकी भरीव रक्कम निश्‍चित केली आहे. यामुळे रत्नागिरी येथे शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लवकरच अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे सुरक्षित आणि सुविधाजनक निवासस्थान उपलब्ध होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button