
मोठी बातमी! महापालिका निवडणुकांचा ‘या’ कालावधीत धुराळा उडणार?
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे बंधन राज्य निवडणूक आयोगावर आहे.त्यामुळे या कालावधीच्या आत निवडणुकांचा धुराळा उडणार आहे, याच पार्श्वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाच्या टाईम लिमिटमुळे राज्य निवडणूक आयोगाने पालिकांसोबतच १२ जिल्हा परिषदांच्याही निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू केली आहे.निवडणूक आयोगाच्या हालचाली आणि वेळापत्रकानुसार, महापालिका निवडणुकांची घोषणा काही दिवसांत होतील अशी शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या रविवारी संपणार आहे. यानंतर लगेचच पुढील आठवड्यात (म्हणजेच डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात) कधीही महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होऊ शकतो.




