मुंबई–गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे महामार्गावर चार चाकी मधून आलेल्या आरोपीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पलायन केले


मुंबई–गोवा महामार्गावरील तळेकांटे, गणेश मंदिराजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका महिलेला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना गुरुवार ११ डिसेंबर २०२५ रोजी घडली.याची फिर्याद भारती भार्गव कळंबटे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली

 फिर्यादी श्रीमती भारती भार्गव कळंबटे (वय ५८, रा. तळेकांटे, चटकवाडी) या पायी घरी जात असताना निळसर- काळ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या एका अज्ञात पुरुष व महिलेने त्यांना रस्त्यापलीकडे बोलविण्याचा इशारा केला. त्यानंतर त्या वाहनातील पुरुष खाली उतरून "रस्ता कुठे जातो" अशी विनम्रपणे विचारपूस करत जवळ आला व क्षणातच फिर्यादींच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची एक लाख रुपये किमतीची  सोन्याची चेन हिसकावून रस्त्याच्या पलीकडे उभी करून ठेवलेल्या चारचाकी गाडीत बसून मुंबईच्या दिशेने पुन्हा फिल्मी स्टाईल वेगाने गाडी पळवली.

घटनेनंतर फिर्यादींनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. रात्री २३.१६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button