मुंबई–गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठीसार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भाजपा रत्नागिरी जिल्हा सचिव राजू भाटलेकर यांनी भेट घेऊन दिले निवेदन


भाजपा रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. राजू भाटलेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन मुंबई–गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे याबाबत निवेदन दिले.
सध्या मुंबई–गोवा महामार्ग अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून त्याचा थेट फटका कोकणातील पर्यटन व्यवसायाला बसत आहे. महामार्गाच्या दयनीय स्थितीमुळे अनेक पर्यटक नाराज होत असून पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे अनेक स्थानिक पर्यटन व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मुंबई–गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन पर्यटन व्यवसायाला मोठा दिलासा मिळेल, अशी स्पष्ट भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली.
या विषयावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
कोकणाच्या विकासासाठी, सुरक्षित प्रवासासाठी आणि पर्यटन व्यवसायाच्या उभारणीसाठी ही भेट निश्चितच महत्त्वाची ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button