माकडांच्या उपद्रवावर वन विभागाचा लगाम, आतापर्यंत २८४ माकडांना पकडण्यात यश


रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही काळापासून माकडांनी उच्छाद मांडला असून, बागायतदार आणि शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी वन विभागाने विशेष मोहीम राबवून जिल्ह्याच्या विविध भागांतून आतापर्यंत एकूण २८४ माकडांना यशस्वीरित्या पकडले आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई राजापूर तालुक्यात करण्यात आली असून, तेथील आकडा २५१ माकडे पकडण्यात आली आहेत. त्याखालोखाल रत्नागिरी तालुक्यातून २२ माकडे जेरबंद करण्यात आली, तर संगमेश्वर तालुक्यात ११ माकडांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यातून २८४ माकडांना पकडून त्यांची या त्रासातून मुक्तता करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button