
भाजी विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्या विकणार्या विक्रेत्याला दंड
चिपळूण शहरातील भेंडीनाका परिसरात मंगळवारी सकाळी भाजी विक्रेत्या महिलांना प्लास्टिकच्या पिशव्या विकणार्या अल्पवयीन युवकाला पकडून त्याच्या मालकाला २ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ही परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी केली. त्याच्याकडून १ किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले.
शहरात प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी न. प. सातत्याने कारवाई करीत आहे. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते व कर्मचारी सातत्याने शहरात पाहणी करीत असतात. मंगळवारी जाधव शहरात गस्त घालत असताना अल्पवयीन युवक सायकलवरुन भेंडीनाका येथे भाजी विक्रीसाठी बसणार्या महिलांना प्लास्टिक पिशव्यांची विक्री करीत होता. त्यामुळे त्याची जाधव यांनी चौकशी केली असता त्याने या पिशव्या सुर्वे नामक दुकानदाराकडून आणल्याचे सांगितले.
www.konkantoday.com




