
निवडणुकीमुळे चिपळूण नगर परिषदेच्या काळात न. प. तिजोरीत ६ लाखाची भर
नुकत्याच पार पडलेल्या चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेकांनी अर्ज भरले होते. त्यामुळे कागदपत्रे तयार करण्यासाठी थकित कर भरण्यापासून विविध दाखल्यांचे शुल्क भरावे लागल्याने नगर परिषदेच्या तिजोरीत सुमारे ६ लाखांची भर पडली आहे.
नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह २८ नगरसेवक पदांसाठी काही दिवसांपूर्वीच मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचा निकाल २१ रोजी जाहीर होणार आहे.
मात्र ही निवडणूक जाहीर होताच इच्छुकांच्या गर्दीचा महापूर आला होता. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी १३, तर नगरसेवकांच्या २८ जागांसाठीही तब्बल १४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक नियम व अटी घालून दिले आहेत. त्यामुळे नगर परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी नियम व अटींची पूर्तता करताना अनेकांनी आपला थकित कर भरला. यातून ५,५०,००० हजार रुपये जमा झाले.www.konkantoday.com




