
नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीच्या स्वयम देसाईला कांस्यपदक
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नदुर्ग पिस्टल आणि रायफल शूटिंग क्लबचा सदस्य असलेल्या युवा नेमबाज स्वयम विक्रांत देसाई याने नवी दिल्ली येथे आयोजित ६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल -ज्युनिअर सिव्हिलियन प्रकारात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व कोरत कांस्यपदक पटकावले आहे.
ज्युनियर सिव्हिलियन महाराष्ट्र संघामध्ये स्वयम विक्रांत देसाई, साईराज काटे आणि प्रांशू सूर्यवंशी या तिघांची निवड झाली होती. या तिघांनी देशभरातील अव्वल नेमबाजांविरुद्ध उल्लेखनीय एकाग्रता, वेग आणि अचूकतेचे प्रदर्शन केले. त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्र ज्युनियर सिव्हिलियन संघाला या स्पर्धेत कांस्यपदक मिळवण्यात मोलाचा वाटा उचलता आला.www.konkantoday.com




