
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर धावणार खातीपुरा-मडगाव स्पेशल
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वेने जाहीर केलेली खातीपुरा-मडगाव स्पेशल रविवारी धावली. २० एलएचबी डब्यांची स्पेशल परतीच्या प्रवासात ३० रोजी डिसेंबर धावणार आहे.
मडगाव ०९७०१/०९७०२ क्रमांकाची खातीपुरा-स्पेशल खातीपुरा येथून सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी सुटून तिसर्या दिवशी सकाळी ४.४० वाजता मडगाव येथे पोहचली. परतीच्या प्रवासात ३० डिसेंबर रोजी मडगाव येथून ५.४० वाजता सुटून दुसर्या दिवशी सायंकाळी ४.१५ वाजता खातीपुरा येथे पोहचेल.
या स्पेशलला जयपूर जंक्शन, किशनगढ, अजमेर जंक्शन, बिजयनगर, भिलवाडा, चित्तोडगढ, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, सुरत, वसई रोड जंक्शन पनवेल जंक्शन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबे आहेत.www.konkantoday.com
मावळंगे येथील तरुण संशोधक राजस शिंदेची आयर्लंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी
जागतिक तापमानवाढ आणि इंधन, टंचाईवर मात करण्यासाठी आज संपूर्ण जग शाश्वत पर्यायांच्या शोधात आहे. अशातच तालुक्यातील मावळंगे येथील तरुण संशोधक राजस शिंदे यांनी आयर्लंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केवळ ’गवत’ आणि ’शेतीतील जैवकचरा’ यांच्यापासून बायोगॅस, बायोप्लास्टिक आणि सेंद्रिय खत निर्मितीचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले असून त्यांच्या या संशोधनाची दखल आयर्लंड सरकारने आपल्या राष्ट्रीय धोरणात घेतली आहे. पीएचडी अभ्यासक्रमा दरम्यान हे संशोधन केले.
राजस शिंदे यांनी आपले पीएचडी संशोधन आयर्लंडमधील प्रसिद्ध ’युनिवर्सिटी कॉलेज कॉ र्क’ येथे पूर्ण केले. त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय ’बायोरिफायनरी’ हा होता. ज्याप्रमाणे कच्च्या तेलापासून पेट्रोल-डिझेल बनते, त्याच धर्तीवर त्यांची वनस्पतींच्या आणि शेतीतील कचर्याच्या माध्यमातून मूल्यनिर्मिती केली आहे.www.konkantoday.com




