नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा पदग्रहण सोहळा उत्साही वातावरणात संपन्न


रत्नागिरी नगरपालिकेच्या नवनिर्मित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचा पदग्रहण सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.​या सोहळ्याला रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक अण्णा सामंत, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, तालुकाप्रमुख महेश म्हाप, महिला संघटक कांचन नागवेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब परुळेकर आणि भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र सुर्वे यांसह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. या प्रसंगी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते उपस्थित सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
​आपल्या पदग्रहण भाषणामध्ये शिल्पा सुर्वे यांनी शहराच्या विकासाचा ध्यास व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ‘रत्नागिरी शहरासाठी अपेक्षित असणारी सर्व विकासकामे आणि नागरिकांच्या हिताचे चांगले काम करण्याला माझे प्राधान्य असेल. सर्वांना सोबत घेऊन शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ असे सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button