
ग्रामविकास विभागातर्फे रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रायगडसाठी १५.८२ कोटींचा निधी जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या केंद्रीय विस आयोगाच्या शिफारशीनुसार अबंधित निधीचा पहिला हप्ता वितरित केला आहे. जिल्हयासह सिंधुदुर्ग, रायगडसाठी ३८.९४ कोटींचा निधी जाहीर केला. त्यामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला आहे.
११ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार, केंद्र शासनाकडून राज्यासाठी मुक्त करण्यात आलेल्या एकूण ७१७.१७ कोटी इतक्या निधीमधून हे वितरण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी अनुक्रमे १०:१०:८० या प्रमाणात हा निधी वितरित करण्यात येत आहे. ज्यामुळे ८० टक्के निधी भेट ग्रामपंचायतींच्या विकासासाठी उपलब्ध उपलब्ध होणार आहे.www.konkantoday.com




