खेडमध्ये आलेल्या पालकमंत्र्यांचा ताफा अडकला वाहतूक कोंडीत


पालकमंत्री उदय सामंत शुक्रवारी सकाळी भरणे येथून खेडच्या दिशेने येत असताना त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. मंत्री मार्गस्थ होत असताना ताफा सुरळीतपणे जाण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाते. मात्र तशी व्यवस्था न झाल्यामुळे कोंडीचा पालकमंत्र्यांनाही फटका बसला.
खेड-भरणे राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. यासाठी भरणे येथे रस्त्यावर खोदाई करण्यात आली असून एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भरणे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जटील बनला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मार्गस्थ होताना तारेवरची कसरत करावी लागतेय.
सामंत शुक्रवारी शिवसेना उपनेते संजय कदम यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी खेडच्या दिशेने येत असताना त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. कोंडीत ताफ्यातील पोलीस यंत्रणांची त्रेधातिरपीट उडाली. एसटी बसेसही अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button