कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागकाम वाटप समिती स्थापन


रत्नागिरी, दि. 30 ):- बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 11 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयान्वये जिल्हास्तरावर कामवाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार 10 लाख रुपये रक्कमेची कामे विना निविदा उपलब्ध करुन देण्यात येतील.
कामवाटप समितीकडे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्रे प्राप्त झाली आहेत. ज्या सेवा सोसायट्यांना या कार्यालयाचे शिफारस पत्र घेऊन नोंदणी झाल्या आहेत अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव 7 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत. सोबत अटी व शर्तीची पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरुपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्वीकारण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त, मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button