कोकण रेल्वेच्या मालवाहतूक सेवेला मोठी चालना देणारी वाढीव ५७ टन क्षमतेच्या रोरो सर्व्हिस कार्यान्वित


कोकण रेल्वेच्या मालवाहतूक सेवेला मोठी चालना देत वाढीव ५७ टन क्षमतेसह दुसरा रोल-ऑन रोल ऑफ (रो-रो) रेक बुधवार दि. ३ डिसेंबरपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेवेत लोडेड ट्रक थेट रेल्वे वॅगनवर चढवून वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध असून त्यामुळे वेळ, इंधन, रस्त्यावरची गर्दी आणि खर्च यांची मोठ्या प्रमाणात बचत होते.
कोकण रेल्वेच्या या नाविन्यपूर्ण सेवेचा उद्योगक्षेत्र आणि वाहतूकदारांना मोठा लाभहोणार आहे. वाढीव क्षमतेचा पहिला रेक ५ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आला होता. त्यानंतर वाढत्या प्रतिसादामुळे दुसरा रेक सुरू करण्यात आला आहे. या रेकमध्ये बीआरएन प्रकारच्या वॅगन्सची क्षमता ५७ मेट्रिक टन तर बीओएक्सएन
वॅगन्सची ५० मेट्रिक टन आहे. या क्षमतेचा लाभ घेत लोखंड, पोलाद, संगमरवरी, टाईल्स, बांधकाम साहित्य आणि इतर जड माल वाहतूक करणार्‍या उद्योगांना आता अधिक सोयीने माल हलवता येणार आहे.
वाढीव वजनासाठी प्रति मेट्रिक टन ८०० रुपये आणि लागू जीएसटी इतके शुल्क आकारले जाणार आहे. कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे की ५७ टन क्षमतेची सुविधा फक्तं या नव्या रेकपुरती लागू राहील, तर इतर रेकसाठी पूर्वीप्रमाणे ५० टन मर्यादाच लागू असेल. बुकिंग आणि सेवेविषयी माहितीकरिता कोलाड आणि सुरथकल येथे स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button