कोकणच्या ‘हापूस’वर गुजरातचा दावा! वलसाड हापूसला ‘जीआय’ मानांकनाची मागणी;


जगाला वेड लावणाऱ्या कोकणच्या हापूस (आल्फान्सो) आंब्यावर आता गुजरातने दावा केल्याने महाराष्ट्रातील आंबा उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.वलसाड हापूस या नावाने भौगोलिक मानांकन (Geographical Indication – GI) मिळवण्यासाठी गुजरातने अर्ज दाखल केला आहे. हापूस आंब्याला मिळालेले ‘कोकण हापूस’ हे जगातले पहिले आणि एकमेव जीआय मानांकन धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.कोकण हापूसला 2008 साली जीआय मानांकन मिळाले. येथील भौगोलिक परिस्थिती, माती आणि विशिष्ट चव (इसेन्स) यावर आधारित सर्व कागदपत्रे 2018 पर्यंत सादर करण्यात आली होती.

कोकण आंबा उत्पादक संघटनेच्या म्हणण्यानुसार, वलसाडमधील आंब्याला त्यांच्या परिसराचे मानांकन मिळू शकते, पण त्याला ‘हापूस’चे मानांकन मिळू नये. ज्याप्रमाणे ‘मिगीला’ आंबा आहे, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आंब्याला ‘वलसाड आंबा’ म्हणून विकावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button