
कशेडी बोगद्यातील भूस्खलन थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतली
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात दरवर्षी पावसाळ्यात होणारे भूस्खलन थांबवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतली आहे. भूस्खलनाचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी रॉक बोल्टिंगसह तारेवरची जाळी बसवण्याचे काम गतिमान करण्यात आले आहे. यामुळे पावसाळ्यात भूस्खलनामुळे खंडित होणारी वाहतूक अधिक सुरक्षित अन् सुरळीत होणार आहे.
कशेडी बोगद्यात दरवर्षी पावसाळ्यात उदभवणार्या समस्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. विशेषतः बोगद्यात होणार्या भूस्खलनामुळे वाहतुकीत व्यत्यय येण्याचे प्रकार सातत्याने घडत होते.www.konkantoday.com




