एकमेकांवर घराणेशाहीचे आरोप करताना सर्वच पक्षांतील घराणेशाहीचे दर्शन, उमेदवारीत कार्यकर्त्यांपेक्षा नातलगांना प्राधान्य!


मुंबई : एकमेकांवर घराणेशाहीचे आरोप करताना सर्वच पक्षांतील घराणेशाहीचे दर्शन उमेदवारांच्या याद्यांमधून झाले आहे. यात कोणताही पक्ष मागे नाही. राज्यभरातील २९ महापालिकांमध्ये उमेदवार पाहिले तर सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यापेक्षा नातेवाईकांना संधी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करून पक्षातून बाहेर पडलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबईतून खासदार रवींद्र वायकर, सदा सरवणकर यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष भाजपचे राहुल नार्वेकर यांच्या घरातील तीन सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नवाब मलिक यांच्या घरातील तीन सदस्य,

शिंदे गट

जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ७३ मध्ये खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती अमेय वायकर – पोतनीस उमेदवारी. माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगी या दोघांनाही उमेदवारी दिली आहे. माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि त्यांची बहीण प्रिया सरवणकर या दोघांना दादरमधून संधी. तर माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे यांनाही पूर्व उपनगरात उमेदवारी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटातूनच समाजकल्याणमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत, मुलगी हर्षदा . आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश जैस्वाल यांनी उमेदवार अर्ज दाखल केला.

भाजप

कुलाबा विधानसभा मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि दुसऱ्या भावाच्या पत्नी हर्षिता नार्वेकर यांना संधी. मकरंद यांची बहीण गौरवी शिवलकर यांनी प्रभाग २२७ मधून अर्ज भरला आहे. किरीट सोमय्या यांचे पुत्र नील , शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले सुरेश गंभीर यांची कन्या शीतल गंभीर, राज के. पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहित यांची वर्णी लागली आहे. पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघातून ‘तुतारी’ चिन्हावर निवडून आलेल्या आमदार बापू पठारे यांनी भाजपकडून कुटुंबात तिघांना उमेदवारी मिळाली. आमदार पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र ,त्यांची पत्नी ऐश्वर्या , आमदार पठारे यांच्या भाचेसून तृप्ती भरणे यांना उमेदवारी.

राष्ट्रवादी अजित पवार गट

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांच्या घरातीलही तीन सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक, बहीण डॉ. सईदा खान आणि कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक यांचा समावेश आहे.

काँग्रेस

काँग्रेसमध्ये मालाडमधील आमदार अस्लम शेख यांच्या नातेवाईकांसाठी मालाडमध्ये चार प्रभाग सोडण्यात आले आहेत. मुलगा हैदर अस्लम शेख, बहीण कमरजहाँ सिद्दीकी, मेहुणा सैफ अहद खान, भाचा रफीक शेख यांना मालाड आणि वर्सोवामध्ये उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाकरे गट

आशिष चेंबुरकर, सुनील प्रभू, सुनील शिंदे यांच्या नातेवाईकांना संधी. छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदार अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन रिंगणात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button