
उपराजधानी नागपुरात घातपाताचा इशारा
उपराजधानी नागपुरात घातपाताचा इशारा देण्यात आलाय..ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद भारतात घातपात घडवू शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय..त्यामुळे पोलिसांनी महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, रेशीमबागेतील स्मृतिभवन यासह सर्वच महत्त्वाची धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवलीय..नागपुरात राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या, होमगार्डसह 10 हजारांवर पोलीस तैनात करण्यात आलेत..याशिवाय, एआयच्या मदतीनेही प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विधानभवन, रामगिरी, दीक्षाभूमी, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानांभोवतीही सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.. हॉटेल आणि लॉजचीही कसून तपासणी करण्यात येतेय.




