
अनोळखी मृतदेह ; पोलीसांशी संपर्क साधावा..
रत्नागिरी, दि. 30 ) : मंडणगड तालुक्यातील बाणकोट ते वेळास जाणाऱ्या समुद्रालगत सार्वजनिक रोडवर 24 जुलै 2024 रोजी दुपारी 1.30 वा. (अंदाजे वय वर्षे 55 वर्षे) च्या दरम्यान मयत अनोळखी पुरुष जातीचे प्रेताच्या नावा-गावाचा तसेच त्याच्या नातेवाईकांचा अद्यापर्यंत सुगावा लागलेला नसून त्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, बाणकोट सागरी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अनोळखी मयत व्यक्तीच्या अंगात केसरी रंगाचा हाफ टी- शर्ट आहे. कसे काळे-पांढरे वाढलेले, अंगावर कोणतेही मौल्यवान वस्तु नाही, मयत यांच्या डाव्या दंडावर निळ्या रंगाची कापडी पट्टी बांधलेली आहे.
000




