
पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकांना तीन महिन्यांच्या मानधनाची प्रतीक्षा
सहायक मत्स्य व्यवसाय विभागासाठी सेवा देणार्या पर्यवेक्षक आणि सुरक्षा रक्षकांच्या मानधनाचा निधी मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव गेला आहे. पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षकांना तीन महिन्यांच्या मानधनाची प्रतीक्षा आहे.रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी.चा समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर तालुक्यांना समुद्र किनारा आहे. या समुद्र किनार्यांवर मासे उतरवण्याची 46 केंद्र आहेत. या केंद्रांवरून समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या नौकांची सर्व माहिती ठेवण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांची असते. या सुरक्षा रक्षकांवर पर्यवेक्षकांचे नियंत्रण असते. कामगार आयुक्तांच्या सागरी मंडळाकडून या पर्यवेक्षकांची आणि सुरक्षा रक्षकांची मागणी केली जाते. या पर्यवेक्षक आणि सुरक्षा रक्षकांच्या दर महिन्याच्या मानधनाचा निधी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून मिळतो. त्यासाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून बिलांचा प्रस्ताव पाठवला जातो. मानधनासाठी सुमारे 24 लाख रुपये मिळण्याबाबतचा प्रस्ताव सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून पाठवण्यात आलेला आहे




