
.5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शाळा बंद आंदोलन जिल्ह्यात 100 % यशस्वी करण्याचा निर्णय
मंगळवार दिनांक 25 रोजी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी मध्ये संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 नुसार होणाऱ्या संचमान्यतेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समन्वय समितीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघटनांच्या मा.अध्यक्ष व सचिव तसेच शून्य शिक्षक शाळांच्या मा.मुख्याध्यापक यांच्या सहमतीने घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित सर्व संघटना पदाधिकारी व मुख्याध्यापक यांनी जिल्ह्यातील शाळा टिकविण्यासाठी सदर संच मान्यतेवर बहिष्कार टाकणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या बहिष्कार आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बहिष्कार आंदोलनामध्ये ठरल्याप्रमाणे संच मान्यते संदर्भातील शाळेची कोणतीही माहिती शिक्षणाधिकारी कार्यालय अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयास देण्यात येऊ नये, संच मान्यतेस उपस्थित राहू नये असे ठरले.सदर बहिष्काराचे रीतसर पत्र समन्वय समितीच्या वतीने मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. रत्नागिरी यांना उद्याच देण्यात येणार आहे. तसेच समन्वय समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयांमध्ये रिट पिटीशन ही दाखल करण्यासंदर्भातील निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच दि. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शाळा बंद आंदोलन जिल्ह्यात 100 % यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर समन्वय समितीच्या वतीने मा.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची भेट घेण्यात आली व येऊ घातलेल्या इयत्ता दहावी,बारावी च्या परीक्षा तसेच शालेय वार्षिक परीक्षा लक्षात घेता व सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रिट पिटिशनच्या निकालावर आधारित पुढील शैक्षणिक वर्षात करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.
तसेच बहिष्कार आंदोलनामध्ये सहभागी होण्यासंदर्भात आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावी. तालुकास्तरावर जिल्हा समन्वय समितीमध्ये सहभागी संघटनांच्या मा.तालुकाध्यक्ष व सचिव यांची तालुका समन्वय समिती तयार करण्यात यावी व तालुक्यात बहिष्कार आंदोलन 100% यशस्वी करण्याचे अनुषंगाने प्रयत्न करावेत असे आवाहनआयुब मुल्ला (अध्यक्ष)
सागर पाटील (सचिव)
*रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समिती. यानी केले आहे.



