
संविधानाने दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आत्मसात करानव्या पिढीला देखील त्याची माहिती द्या – जिल्हाधिकारी
रत्नागिरी, दि.26 ) – संविधानाने दिलेली कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या या सर्वांनी आत्मसात करायला हव्यात. याची माहिती नव्या पिढीला विशेषत: विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना व्हायला हवी. ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संविधान दिन साजरा करण्यात आला. सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संविधानाची प्रत आणि संविधान उद्देशिकेची प्रतिमा दिली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. उपस्थित अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी या उद्देशिकेचे वाचन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते संविधान दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे, वरिष्ठ सहाय्यक यु.एम. आष्टुरे, तालुका समन्वयक अमोल पाटील, कनिष्ठ सहाय्यक रितेश सोनवणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000




