
संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये1,2,3 डिसेंबर मद्य विक्री बंद
रत्नागिरी, दि.२५) : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतीच्या (एकूण २८८) सदस्य पदासाठी व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण व खेड या नगरपरिषदा व लांजा, देवरुख, गुहागर या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान व दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ चे कलम १४२ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त आदेशान्वये, जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/ विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-२, एफएल-३. एफएल- ४ ( क्लब अनुज्ञप्ती), एफएल / बीआर-२, सीएल-२, सीएल-३, सीएल / एफएल/टिओडी-३, टिडी-१ इ.) १ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर २०२५ रोजी (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ कलम ५४ व ५६ मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.000




