
संच मान्यतेचे नवीन निकष कायम ठेवल्यामुळे रत्नागिरी जिल्हयात १६५ शाळा बंद पडणार
शासनाने निश्चित केलेले संच मान्यतेचे नवीन निकष कायम ठेवत १४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिनाच्या दिवशी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे खेडोपाड्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार असल्याचा धोका निर्माण झाला आहे असे शिक्षणक्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी शासनाला कळविले आहे. संच मान्यतेचे नवीन निकष जरी आरटीई कायद्यानुसार असले तरी ते दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारे आहेत. त्यामुळे आरटीई कायद्यात सुधारणा करावी व गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या बजीकच्या शाळेत शिकता यावे यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी सुधीर घागस यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.
www.konkantoday.com




