
विद्यापिठाच्या अधिस्विकृतीसाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून सहा सदस्यांकडून पाहाणी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली आणि त्याच्या अधिनस्त असलेली सर्व घटक महाविद्यालये यांची भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून दर पाच वर्षानी अधिस्विकृतीसाठीची तपासणी केली जाते. या तपासणीवर विद्यापीठाचा दर्जा ठरत असून या विद्यापिठातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना परराज्यातील इतर विद्यापीठात प्रवेश मिळविणेसाठी आणि निधी मिळणेसाठी उपयोग होत असतो. यासाठी नुकतीच डॉ.पी. के. शर्मा, माजी कुलगुरु शेर ए काश्मिर कृषि विद्यापीठ, जम्मू यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांनी विद्यापिठाची पाहणी केली. या सदस्यांमध्ये डॉ.एन.एस. राणा, माजी अधिष्ठाता, मोदीपुरम, डॉ. सी.आर. मेहता संचालक, सीआयएई, भोपाळ, डॉ. पी. के. सिंग, संशोधन संचालक, बीएयु, रांची, डॉ. मधु सुब्रमण्यम, केरळा कृषि विद्यापीठ, त्रिचुर, डॉ. एस. के. दास, अधिष्ठाता, ओरिसा कृषि विद्यापीठ, भुवनेश्वर आणि डॉ. नवीनकुमार जैन, सदस्य सचिव, प्रमुख शास्त्रज्ञ, भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचा समावेश होता. पाहणी दरम्यान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाअंतर्गत येणार्या कृषि महाविद्यालय, दापोली, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली, वनशास्त्र महाविद्यालय दापोली, उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, आणि मत्स्य महाविद्यालय शिरगांव या महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन महाविद्यालयांमधील असलेल्या सोयीसुविधा, प्रशासन, संशोधन आणि विस्तार यांचे प्रत्यक्ष अवलोकन केले.www.konkantoday.com



