
राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात उघडण्यात आलेल्या पासपोर्ट कार्यालयातून ८,६२६ पासपोर्टची नोंदणी
राजापूर शहरातील पोस्ट कार्यालयात उघडण्यात आलेल्या पासपोर्ट कार्यालयातून गेल्या वर्षभरात ८ हजार ६२६ पासपोर्टची नोंदणी करण्यात आल्याची माहिती येथील कार्यालयातून देण्यात आली. दिवसागणिक या पासपोर्ट सेवा कार्यालयाचा जनतेला चांगलाच फायदा होत असून चांगली सुविधा केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तळकोकणातील २ जिल्हयासाठी हे पासपोर्ट कार्यालय कार्यान्वित आहे. राजापूर पोस्ट कार्यालयात सन ऑगस्ट २०१८ साली पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून कोविडमधील काही काळ वगळता या पासपोर्ट सेवा केंद्राला चांगला प्रतिसाद लाभला आहे. गेल्या काही वर्षात अनेक नागरिकांनी या कार्यालयात आपल्या पासपोर्टची नोंद केल्यानंतर त्यांना पासपोर्ट प्राप्त झाले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत या कार्यालयात ८ हजार ६२६ पासपोर्टची नोंदणी करण्यात आल्याची माहिती येथील पासपोर्ट सेवा केंद्रातून देण्यात आली. यापूर्वी पासपोर्ट नोंदणीसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या, मात्र केंद्र सरकारने तळकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्हयासाठी राजापूर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करून दोन जिल्ह्यातील नागरिकांची होणारी अडचण दूर केली आहे. मागील काही वर्षात पासपोर्टसंबंधी नागरिकांच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
www.konkantoday.com




