
मिरजोळे एमआयडीसी परिसरातील रेल्वे पुलावर रेल्वेच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरातील रेल्वे पुलावर सोमवारी सायंकाळी वंदे भारत एक्सप्रेसची एका (अंदाजे ६० वर्षीय) अनोळखी वृद्धाला जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती रेल्वे चालकाने तातडीने रेल्वे प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे पुलावरील ट्रॅकजवळ पाहणी केली असता, वृद्ध रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पाठवला आहे. घटनेतील मृत व्यक्तीची ओळख पटवण्याची कार्यवाही पोलिसांनी हाती घेतली असून या प्रकरणी ग्रामीण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com




