
भारतीय क्रीडा प्राधिकरणने आयोजित केलेल्या ट्रायथलॉन क्रीडा स्पर्धेला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि भारतीय ऍथलेटिक्स महासंघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता लिग ऍथलेटिक स्पर्धेत ट्रायथलॉ न क्रीडा प्रकारात १४ वर्षा मुलींच्या गटात आरोही शिर्के, अर्सिन खातिन आणि शुभ्रा सरफरे यांनी विजेतेपद पटकावले. तर १५ वर्षाखालील मुलींच्या गटात ६० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. रत्नागिरी जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने या स्पर्धा एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल, डेरवण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. १४ व १६ वर्षाखालील मुलींच्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उदघाटन खेलो इंडियाचे प्रशिक्षक कृष्णांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे, प्रशिक्षक अविनाश पवार, अजहर खलपे, प्रशांत कवळे उपस्थित होते. भारतातील ३०० जिल्ह्यांमधून ही अस्मिता लिग ऍथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून गुणवताधारक खेळाडूंची निवड करणे, हा प्रमुख उद्देश आहे. या गुणवत्ता शोध अस्मिता ऍथलेटिक्स स्पर्धेतून जिल्ह्यातील मुलींना एक माध्यम तयार होईल, असे संदीप तावडे यांनी सांगितले. भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याकडून आलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी या स्पर्धेतून गुणवत्ताधारक खेळाडूंची चाचणी घेऊन त्यांची पुढील स्पर्धा व प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देताना, आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अतिशय चांगली कामगिरी स्पर्धेदरम्यान नोंदवली. प्रथम ३ क्रमांकाच्या खेळाडूना भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. अशा प्रकारची स्पर्धा दरवर्षी भारतातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार असून यातून गुणवत्ताधारक खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अद्ययावत अशा एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात या मुलांना खेळण्याची संधी मिळत आहे, ही या मुलांसाठी अविस्मरणीय बाब असल्याचे मत खेलो इंडियाचे प्रशिक्षण कृष्णांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.www.konkantoday.com




