
बाल विवाह मुक्त भारत मोहीम 100 दिवस कार्यक्रमाचाविशाखापट्टणम येथून गुरुवारी शुभारंभ
रत्नागिरी, दि. 26 ):- महिला व आणि बाल विकास मंत्री यांच्या विशाखापट्टणम येथे होणाऱ्या बाल विवाह मुक्त भारत मोहिमेच्या 100 दिवसांच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम उद्या 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वेबकास्ट लिंकवर (https://webcast.gov.in/mwcd) दाखविण्यात येणार आहे. या अनुषंगाने बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, महिला बचत गट, पंचारत राज संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी तसेच इतर आरोग्य कर्मचारी, बार व कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सदस्य, शाळा व महाविद्यालये, विद्यार्थी, शिक्षक, धार्मिक नेते, प्रभावशाली सेवा प्रदाते जसे की स्थळ प्रदाते, हॉल मालक, केटरर्स, बँड पार्टी, फुलवाले, डिजे, सजावट करणारे, वाहतूकदार, स्थानिक नेते, नागरी समाज संघटना आणि सामान्य नागरिक सर्वांनी शुभारंभ कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले आहे.




