
प्रकरणाची गुणवत्ता पाहूनच निर्णय द्यायचा असतो -माजी सरन्यायाधीश भूषण गवई
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रत्येक निर्णय सरकारच्या विरोधात दिला तरच ते स्वतंत्र बुद्धीने न्यायदान करणारे न्यायाधीश आहेत, अशी समजूत काही जणांनी करुन घेतली आहे. तथापि, आम्ही प्रत्येक निर्णय कोणाच्या बाजूने किंवा कोणाच्या विरोधात अशा प्रकारे न देता, प्रकरणाची गुणवत्ता पाहून देत असतो, अशा कानपिचक्या देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिल्या आहेत.
त्यांचा निरोप सभारंभ शनिवारी करण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. कोणत्याही प्रकरणावर निर्णय देताना न्यायाधीशांनी त्या प्रकरणाच्या गुणवत्तेचा विचार करायचा असतो. प्रत्येक निर्णय सरकारच्या विरोधात दिला, तरच न्यायाधीश स्वतंत्र बुद्धीचे किंवा निःपक्षपाती आहेत अशी समजूत पूर्णतः चुकीची आहे. ज्याची बाजू घटनेच्या, कायद्याच्या आणि परिस्थितीच्या दृष्टीने योग्य आहे, त्याच्या बाजूने कोणत्याही प्रकरणाचा निर्णय देणे, हे न्यायाधीशांचे कर्तव्य आहे. निःपक्षपातीपणा किंवा परखडपणा सिद्ध करण्यासाठी सरकारच्या विरोधातच निर्णय द्यावा लागतो, असे मुळीच नसते. माझ्या सर्वोच्च न्यायालयातील कार्यकाळात मी अनेक निर्णय दिले. ते सर्व पक्षकार कोण आहे हे न पाहता, प्रकरण अशा प्रकारचे आहे, हे पाहून दिले असून मी या संदर्भात समाधानी आहे. आमच्या समोर येणार्या प्रत्येक प्रकरणाकडे आम्ही समान दृष्टीकोनातूनच पाहतो असेही ते म्हणाले.www.konkantoday.com



