
’टीईटी’ विरोधातील मोर्चात रत्नागिरीतील शिक्षक संघ ताकदीने उतरणार
५ डिसेंबरला टीईटीविरोधात राज्यभरात शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीतर्फ महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ताकदीने सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. या संकटातून मार्ग काढण्याऐवजी राज्य सरकारकडून जबाबदारी – झटकण्याचा प्रकार पहायला मिळत आहे. देशातील उत्तरप्रदेश, उत्तराखंड तामिळनाडू सरकारने टीईटी सक्ती निर्णयाविरोधात कायदेशीर पावले उचलली असताना एकट्या महाराष्ट्र सरकारलाच पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी काय कायदेशीर आडच्चा. आहे, असा सवाल आहे. सरकारने टीईटी निर्णयाविरोधात ठोस भूमिका घ्यावी, यासाठीच राज्यभरातील शिक्षक शाळा बंद ठेऊन मोर्चा काढणार आहेत. याबाबत शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा रत्नागिरी पूर्ण ताकदीने मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com



