
चिपळूण काँग्रेसच्या प्रभारी तालुकाध्यक्षपदी प्रकाश साळवी
रत्नागिरी
चिपळूण काँग्रेसच्या प्रभारी तालुकाध्यक्षपदी खेर्डीचे रहिवासी, कुंभार समाजाचे नेते प्रकाश साळवी यांची निवड करण्यात आली आहे. लियाकत शाह यांना निलंबित केल्याने ही निवड करण्यात आली आहे. तसेच प्रभारी शहराध्यक्षपदाची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते कैसर देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नगर परिषद निवडणुकीत पक्षकामाला गती येण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने या नियुक्त्या केल्या आहेत.




