
गेल्या महिनाभरापासून ’जनशताब्दी’ एक्सप्रेसची रखडपट्टी कायम
कोकण मार्गावरून धावणारी मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस गेल्या महिनाभरापासून विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची रखडपट्टी कायम राहिली आहे. तेजस एक्स्प्रेससह एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसलाही कायम ’लेटमार्क’ मिळत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. ऑपरेशनल बदल लागू झाल्यापासून विस्कळीत वेळापत्रकाची स्थिती अधिकच बिघडत चालली आहे. विस्कळीत वेळापत्रकाचा स्थानिक रहदारीवर परिणाम होत आहे.www.konkantoday.com



