
खारवी समाज विकास पतसंस्थेचा दिमाखदार सहकार मेळावा
- आर्थिक सबलीकरणाला नवी गती
- साखरी आगर विभागासाठी नवीन सेवा केंद्राची घोषणा.
गुहागर:- खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था, रत्नागिरीने अल्पावधीत ग्राहकांचा ठाम विश्वास संपादन करत सलग सात वर्षे ‘अ’ वर्गाचा मान राखला आहे. ३७ कोटींपेक्षा अधिक भागभांडवल, पाच शाखांमधील सक्षम आर्थिक उलाढाल, ठेवीदारांना आकर्षक 9% व्याजदर आणि सभासदांना भरघोस लाभांश या घटकांमुळे संस्था रत्नागिरी सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.
•आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त रत्नागिरी, गुहागर आणि दापोली येथे घेतलेल्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथे आयोजित मुख्य मेळाव्यात पंचक्रोशीतील ग्राहकांची मोठी उपस्थिती लाभली. अत्याधुनिक संगणकीकरण, NEFT सेवा, QR कोड, मोबाईल बँकिंग सुविधा, सोनेतारणास सुरक्षित लॉकर सेवा, CCTV आणि सुरक्षा अलार्मसारख्या सुरक्षायोजन या सर्व अत्याधुनिक सुविधांमुळे पतसंस्थेने हजारो ग्राहकांचा विश्वास जपला असल्याची भावना अध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केली.
•ग्राहकांच्या मागणीनुसार साखरी आगर विभागातील पंचक्रोशीसाठी नवीन सेवा केंद्र सुरू करण्याची घोषणा या मेळाव्यात करण्यात आली. त्यामुळे आर्थिक व्यवहारासाठी दूरवर जाण्याचे अंतर आणि खर्च दोन्ही कमी होऊन स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
•या कार्यक्रमास अध्यक्ष संतोष पावरी, उपाध्यक्ष सुधीर वासावे, संचालक वासुदेव वाघे,कमलाकर हेदवकर, कृष्णा तांडेल,प्रभारी कार्यकारी अधिकारी दौलत नाटेकर,पालशेत शाखाधिकारी गणेश ढोर्लेकर, कर्मचारी अविनाश
म्हातनाक, समन्वय समिती पदाधिकारी अनिल जागकर, प्रकाश नाटेकर प्रभाकर शिरगावकर, मारूती होडेकर व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.पंचक्रोशोतील सभासद,हितचिंतक व मान्यवरांची उपस्थिती लाभली.



