
चिपळूण तालुक्यातील शिरगाव गुहागर विजापूर मार्गावरील वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळील कॅनल परिसरात टँकर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील शिरगाव गुहागर विजापूर मार्गावरील वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळील कॅनल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. रविवारी रात्री अंदाजे १०.३० वाजताच्या सुमारास टँकर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टँकर चालक चिपळूणकडे जात असताना हा अपघात झाला. टँकर घसरू लागल्याने चालकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला; मात्र टँकर तात्काळ पलटी झाल्याने तो त्यातच अडकून मृत्यूमुखी पडला.




