
रत्नागिरी आगार येथे डिझेल पंपाच्या बिघाडामुळे एसटी वेळापत्रक कोलमडले
रत्नागिरी आगार येथे डिझेल पंपात तांत्रिक बिघाड झाल्याने शुक्रवारी एसटीचे वेळापत्रक कोलमडले. या घटनेने बस फेर्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. दरम्यान शुक्रवारी उशिरा तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्याने पुन्हा सेवा पूर्ववत करण्यात आल्याचे एसटीच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. मोठ्या संख्येने कामगारवर्ग, विद्यार्थी एसटीने रत्नागिरी शहरात येत असतात. शुक्रवारी अचानक एसटीच्या डिझेल पंपात बिघाड झाला. यामुळे एसटीत डिझेल भरण्यात अडचणी निर्माण झाल्या. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. अखेर टेक्निशियन बोलावून एसटीचा डिझेल पंप दुरुस्त करण्यात आला.www.konkantoday.com




