
मिरकरवाडा येथे प्रौढाचा समुद्रात बुडून मृत्यू
रत्नागिरी शहरातील मिरकवाडा बंदर येथील जेटी क्र. २ येथे समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मिलिंद अनंत खेडेकर (वय ४६, रा. म्हाडा कॉलनी, कोकणनगर, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास मिरकरवाडा जेटी क्र. २ येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद खेडेकर हे मिरकरवाडा जेटी क्र. २ येथे समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत सापडले. नातेवाईकांनी त्यांना उचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com




