
हेरिटेज सायकल राईड- कातळशिल्प, कोळंबेरविवार दि. २३ नोव्हेंबर रोजी आयोजित
‘हेरिटेज विक’ म्हणजे जगभरातील वारसा स्थळे आणि संस्कृतींचा उत्सव साजरा करण्याची एक आठवडाभराची मोहीम (१९ ते २५ नोव्हेंबर) होय. हा उत्सव जगभरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आयोजित केला जातो. याचे औचित्य साधून येत्या रविवारी दि. २३ नोव्हेंबर रोजी *रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि *निसर्गयात्री संस्था व *आयआयटी एम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन आयआयटी मद्रास द्वारा संचालित *”कोंकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, रत्नागिरी” यांच्या संयुक्त विद्यमाने कोळंबे (पावस रोडवर) येथे कातळशिल्प पाहण्यासाठी सायकल राईडचे आयोजन करत आहोत.
कोंकणातील कातळशिल्प वारसा व संवर्धन केंद्र हे राष्ट्रीय स्तरावरचे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे, जे कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे वैज्ञानिक अन्वेषण, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यावर काम करत आहे.
दि. २३ नोव्हेंबर २०२५
🚴♂️ सकाळी ६.३० वाजता जयस्तंभ येथून सुरवात.
कोळंबे येथे पोहोचून तिथे साधारण पाऊण तासांत माहिती दिली जाईल.
नंतर परत येऊन ‘कोंकणातील कातळ शिल्प वारसा जतन केंद्र,’ डॉ. बा. ना. सावंत रोड, राधाकृष्ण चित्रपटगृहाजवळ, रत्नागिरी येथे अर्धा तास केंद्रातून कातळशिल्पांची अधिक माहिती देण्यात येईल. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल.
महत्त्वाची सूचना
▪️ सायकल रॅलीसाठी हेल्मेट अत्यावश्यक.
▪️ सोबत पाण्याची बाटली, चिक्की आणावी.
▪️ सकाळी थंडी पडत असल्याने चेहेऱ्याला मास्क आणावा.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब



