
रत्नागिरी शहर वाहतूक कोमात केवळ 30 सिटी बसेस द्वारे बस सेवा सुरू
कोकणातील रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील शहरी बससेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. 100 हून बसेसची मागणी आणि शहर हद्दबरोबरच परिसरातील गावांना गरज असताना केवळ 30 सिटी बसेसद्वारे बससेवा सुरू आहे.यातील काही बसेस भंगारात गेल्या असून आणखी काही बसेस भंगारात जाण्याची वाटेवर आहे. यामुळे अनियमित वेळा, तोकड्याबसेसमुळे शहरातील प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार संतापले आहेत.
शहराच्या बससेवा तोकड्या पडत असल्यामुळे ग्रामीण बसेसवर अवंलबून राहावे लागत आहे. त्यामुळे शहरी बससेवेकडे एसटी विभाग, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असून सिटी बसला बुस्टर डोस देण्याची गरजा आहे. रत्नागिरी आगारात ई-बसेस आल्यास, नवीन मिडीबसेस आल्यास खऱ्या अर्थाने प्रश्न मिटणार.




