
रत्नागिरी जिल्ह्यात “सागर कवच अभियान – ०२/२५” यशस्वी
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये १९ नोव्हेंबरला सायंकाळी ६ ते २० नोव्हेंबर सायंकाळी ६ यावेळेत “सागर कवच अभियान ०२/२५ अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये रत्नागिरी पोलीस दल, तटरक्षक दल, नौदल, कस्टम, बंदर विभाग, फिशरिज विभाग, समुद्र किनाऱ्यावरील खासगी बंदरे, जेट्टी आस्थापना सहभागी झाल्या होत्या. हे अभियान भारतीय तट रक्षक दलाकडून एकाच वेळी महाराष्ट्र व गोवा राज्यात राबविण्यात आले.
या अभियानाचा उद्देश सागरी मार्गाने होणाऱ्या घुसखोऱ्या व आतंकवादी कारवाई रोखणे तसेच सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व विभागांनी घ्यायची खबरदारी, युद्धजन्य परिस्थितीत प्रतिसाद यांचा सराव करणे व किनारपट्टी सुरक्षेसंबंधी सर्व सागरी घटकांना प्रशिक्षण देणे व सागरी सुरक्षा घटकांमध्ये समन्वय साधणे हा होता.
या अभियानादरम्यान १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२५ वाजता शत्रू पक्ष (टेड फोर्स) कडून एक घुसकोर टीम बोटी द्वारे रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने पाठविण्यात आली होती. या अभियानमधील बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) कडून “आई लाभ-लक्ष्मी” या ट्रॉलर बोट पेट्रोलिंग दरम्यान लाइट हाऊस रत्नागिटी समोटील अरबी समुद्रात ३.५ नॉटिकल मैल अंतरावर ही रेड फोर्स (शत्रू पक्ष) “नवदुर्ग” नावाची (IND-MH-06-199 | 09) एक बोट संशयास्पद फिरताना पकडण्यात आली आहे. या दलाने बोटीवर चढून चौकशी केली असता बोटीवर अभियानामधील संशयित ६ इसम मिळाल्याने बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) यशस्वी झालेली आहे.
या अभियाना दरम्यान ४८ पोलीस अधिकारी, ४६४ पोलीस अंमलदार, १०० होम गार्ड, ४७ सुरक्षा वार्डेन, ४१ सागर रक्षक दल सदस्य, ६८
पोलीस पाटील, ४४ एनसीसी कॅडेट, ४० एनएसएस विद्यार्थी इतके मनुष्यबळ, तसेच २ अधिग्रहीत ट्रॉलर वापरण्यात आले.
या अभियाना दरम्यान एकूण ४ हजार ७८७ विविध वाहनांची, ९ हजार ७८९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. समुद्रातील विविध ८० बोटी व या बोटीवरील ९६० व्यक्ति तपासण्यात आल्या.



