
मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड-पेणमध्ये भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील पेण- गणपतीवाडा-हद्दीत बुधवारी रात्री दुचाकीला झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. नीलेश किरण पाटील (२२, नदीमाळनाका), वरद अमित सुतार (१९, परीटआळी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हे दोघे दुचाकीने (एमएच ६ सीटी ८९३४) पेणच्या दिशेने जात असताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकार्यांनी दोघांना तपासले असता मृत घोषित केले. ते दोघेही जीवलग मित्र होते.
www.konkantoday.com




